STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

अठ्ठावीस मार्च

अठ्ठावीस मार्च

1 min
369

 अठ्ठावीस मार्चची सांज...! रामायण पाहुनी महाभारताची सुरुवात घरी मी थोपविली... आहे त्यात भागवण्याची युक्ती मी आज घरी आवलंबविली... दूधापासून दळणापर्यंत सारे कालच नीटनेटके सावरले... म्हटले नियमांचे पालन करायचेच तर मग आपण तरी का मागे रहायचे... घेतले आप्तांना व्हॉट्सअप ग्रुपवरती गाण्याच्या ऑडिओ चला तयार करू... प्रत्येकाचे आवाज आपण आज सारे गाण्यातूनच चला रेकॉर्ड करू... नवी जुनी गाणी आठवणींसह येऊ लागली पहाता पहाता तीनचार तासात सर्वांची गाणी रेकॉर्ड झाली.. दिवस आजचा खूप मजेत आम्ही घालवला, पोपटाला पाहून साऱ्यांनी घराचाच आश्रय ठेवला... घरात राहू मनात राहू प्रत्येकाच्या हृदयात राहू व्हॉट्सअपच्या संपर्कात राहू... कोरोना फिरोना विसरून जाऊ सुट्टीची मजा लुटु आणि संकटातून या लीलया सुटू.... शुभ सायंकाळ...शुभ रात्री...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational