STORYMIRROR

Sandhya Purushottam jadhav

Tragedy Classics

3  

Sandhya Purushottam jadhav

Tragedy Classics

अतिरेकी पाऊस

अतिरेकी पाऊस

1 min
160

यंदा पावसाने केली

चांगलीच मेहेरबानी

जिकडे तिकडे केले

पाणीच पाणी


ढगफुटीचेे रुप घेऊन

बरसला पाऊस

चातक बनणार्‍या डोळ्यांची

चांगलीच फेडली हाऊस


बंद असायचा प्रवेश त्याला

माणसाच्या घरात घुसण्याचा 

यंदा जिद्दीनेच आला

घुसला घरात एकदाचा


गर्वाने इतकी फुगविली छाती

गिळंकृत केलेले दिसले ते

काहीच नाही ठेवले

त्यानेे माणसाच्या हाती


येरे येरेे पावसा

ऐवजी जा रे जा रे पावसा

म्हणण्याची वेळ

आली रे माणसा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy