अस्तित्वाचा लढा
अस्तित्वाचा लढा
लढायचा आहे,
अस्तित्वाचा लढा!
आम्हा महिलांचा,
हा रूढींना वेढा !!
नेहमीच काय,
रांधा आणि वाढा?
धुणी, भांडी आणि,
खरकटी काढा?
ऑफिस मध्येही
व्याप तो केवढा?
मोबदला मात्र,
चिंचोक्या एवढा!!
जिकडे तिकडे,
नन्नाचाच पाढा !
अन्याया विरूद्ध,
आसूड तो ओढा !!
समानता डंका,
वाजतो जेवढा;
आहे का प्रत्यक्ष,
दर्जा हो तेवढा ?
सोडवूया आता,
कायमचा तिढा!
लढूया सख्यांनो;
अस्तित्वाचा लढा!!
