STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Inspirational

4  

swati Balurkar " sakhi "

Inspirational

अस्ताव्यस्त

अस्ताव्यस्त

1 min
418

अस्ताव्यस्त झालय आयुष्य

ओस पडलेल्या इमारतीसारखं!

खुणा आहेत अजुनही तशाच,

काहीतरी सुंदर , उपयोगी आणि छानसं

होतं इथे हे सांगण्या साठी शिल्लक!


मोठ मोठ्या भवनांचे खंडहर बनतात

समाध्यांचे थडगे बनतात आणि

आठवणींचे काय रे , त्याचं काय बनतं

जुनं झाल्यावर, गंज चढल्यावर ,अनुपयोगी होताना?

इथे एक इस्पितळ होतं , अनाथालय कि

वृद्धाश्रम किंवा सुधारग्रह किंवा आणखी काही. .

आता मात्र ओसाड ,अस्ताव्यस्त . .अनुपयोगी भवन!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational