असला कसला हा दादला
असला कसला हा दादला
असला कसला हा दादला
नेईना मला बाहेर फिरायला
जाऊ म्हटले पिक्चर बघायला
त्याला जागरणाचा कंटाळा आला||१||
असला कसला हा दादला
चला बोलले समुद्र चौपाटीला
बोलतो ऊन लागेल माझ्या राणीला
चल झोपूया दुपारच्या टायमाला
जावू संध्याकाळी घरामागच्या बागेला||२||
असला कसला हा दादला
चल जाऊ बोलले मॉलमध्ये शॉपिंगला
बोलतो माझा सारा पगारच संपला
पुढच्या महिन्यात आणू साडीचोळीला
आता सध्या नेस या जुन्याच पोतेऱ्याला||३||
असला कसला हा दादला
चल जाऊ म्हटले हॉटेलला जेवायला
बोलला तुझ्या हाताची चव नाही त्याला
खाऊया घरचे पौष्टिक अन्न लंचला
जाऊ पुन्हा कधी जेवायला खानावळीला||४||
असला कसला हा दादला
विचारले सोडतोस का मला माहेराला
तर बोलतो चल लाग जायच्या तयारीला
महिनाभर रहा आपल्या माहेराला
भेट लाडक्या आपल्या आई बापाला||५||
असला कसला हा दादला