STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

अश्रूंचे पाट

अश्रूंचे पाट

1 min
171

मूक रुदन ते अश्रुंचे,

जखम काळजात खोलवार,

हाती आयुष्य नियतीच्या,

जीवन असे लाचार. .१.


जीवनातला आधार संपता,

हुरहुर जीवाला लावून जाता,

पोकळी उरे मग जीवना,

अश्रूंचे हे पाट वाहता. २.


सुख संपदा माहेरातली,

ओलांडुनी सासरी निघता,

आठवणींना कसे विसरता,

मग अश्रूंचे पाट वाहता. ३.


सद्भावना ही खोटी ठरता,

चांगुलपणा ही वाईट होता,

काय चुकले, कधी न कळता,

अश्रूंचे मग पाट वाहता.  ४.


भरूनही , रितेपण भासता,

मग भावनांचे आभाळ भरता,

एकाकी पण सोबत असता,

मग अश्रूंचे पाट वाहता. ५.


काय गमावले ,काय कमावले,

हिशोब कसा, तो न लागता,

वळणावरूनी मागे पाहता,

सांजवेळ ही ओली होता. ६.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract