STORYMIRROR

Sant Tukaram

Classics

2  

Sant Tukaram

Classics

अशक्य तों तुम्हा नाही

अशक्य तों तुम्हा नाही

1 min
17.5K


अशक्य तो तुम्हा नाही नारायणा ।

निर्जिवा चेतना आणावया ॥१॥


मागे काय जाणो स्वामीचे पवाडे ।

आता का रोकडे दावू नये ॥२॥


थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे ।

म्हणवितो दास काय थोडे ॥३॥


तुका म्हणे माझे निववावे डोळे ।

दावूनी सोहळे सामर्थ्याचे ॥४॥


शंखचक्रगदापद्म ।

पैल आला पुरुषोत्तम ॥५॥


नाभी नाभी भक्तराया ।

वेगी पावालो सखया ॥६॥


दुरूनी येता दिसे दृष्टी ।

धाके दोष पळती सृष्टी ॥७॥


तुका देखोनी एकला ।

वैकुंठीहूनी हिर आला ॥८॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics