अशी माझी कविता असावी
अशी माझी कविता असावी
शब्दांतून खळखळून वाहावी
या हृदयातून थेट
त्या हृदयात पोहोचावी
मनतील भाव, शब्दात मांडणारी असावी
अशी माझी कविता असावी
नऊ रसांनी नटलेली असावी
भावनांनी ओथंबून असावी
प्रत्येक रसात चिंब भिजावी
शब्दांतून मधाळ वाटावी
अशी माझी कविता असावी
काळजाला प्रेमळ शब्दांची झालर असावी
शब्दांनी शब्दांसाठी मैफिल सजवावी
शब्दांनी शब्दांना शब्दांची दाद द्यावी
शब्दांनी शब्दांचे माहेरपन जापणारी असावी
अशी माझी कविता असावी
शब्दांना कुठली जात नसावी
हेव्या-देव्यातून ती हद्दपार असावी
प्रत्येक मनाचा ती ठाव घेणारी असावी
मनमनात ती हास्य फुलवणारी असावी
अशी माझी कविता असावी
