अशी झाली माझी गत
अशी झाली माझी गत
लागली तंबाखूची लत न्
अशी झाली माझी गत..!धृ!
मी लहान होतो तेंव्हा
मी शिकत होतो जव्हा
धोंडब्यानी तंबाखू खाल्लं
मलाबी त्यांनी दिलं
अहो मी टाकली तोंडात..!
लपून छपून खाण्याचा बेत
कुणी टोकण्याचं धाक होतं
प्राप्त खाऊचे पैसे खर्चत
खात होतो मित्रा संगतीत
गेलं व्यसन वाढत..!
विना तंबाखू रहावेना
किती प्रयत्ने सोडवेना
येत होती राहून तलफ
वाटे तोंडी गुफावी खूप
शिरलं तंबाखूचं भूतं..!
आता झालाया कॅन्सर
खूप दाटून येते ऊर
जीव तडपे खाटेवर
यम फास अगदी जवळ
होते जीवाची फरफट..!
पोरांनो माझे ऐका
नका पत्करू असा धोका
तुमचा संसार सुखाचा जावो
माझा आशिर्वाद तुम्हा पावो
मी चाललो रं मसनात..!
