अशा !
अशा !
पाऊस असतां, का लाजत एकटीच तू उभी
चिंब चिंब जलधारांनी भिजव आपली छबी
चंद्र कशास हवा, अनाहुत भासे तो आकाशी
चमचमता असतां, हसरा मुखडा तुजपाशी
हिरे मोती, मूल्यवान जरी दु:ख सदा दावीती
टप टप आसवं लोचनांत मोत्या सम भासती
ओठ डाळींबी कमल कळी, वापर कर तयांचा
बोलत बोलत हसत रहा, दर्शव गाल खळीचा
ऊन्हे परतती, वाट पाहती, दररोज ती बापडी
धावत धावत, ये आगाशीत कर बहाणे थोडी
नकोच पडू प्रेमात, नाही कुठली ही अपेक्षा
हातात हात मैत्रीचा, द्यावास ही मात्र आशा !!
