STORYMIRROR

Vrushali Vajrinkar

Tragedy Inspirational

4  

Vrushali Vajrinkar

Tragedy Inspirational

असाही पाऊस

असाही पाऊस

1 min
325

तो असा अवकाळी बरसून गेला

तो पाऊस होता सारे घेऊन गेला,

त्या भीषण रात्री अवचित घडले सारे

वाहून गेली माणसे आणि जनावरे....

त्या पावसाची रुद्र थयथय बघता

हतबल झाली निरपराधी जनता

वाहून गेली उभी आलेली पिकं,

डोळ्यात तून हाटेना पाणी

हिरावले सगळे सुख...

शेतकरी झाला निराधार तरी

वाचवले त्याने मूक प्राणी ....

केली निसर्गदेवतेची मनधरणी

आता नको कोपवू आभाळाला,

राख जरातर आमची लाज

तुला विनवणी पावसा...आज.

हिम्मत हरलो नाही

,पुन्हा उभारी घेऊ...

अजूनही खचलो नाही

नव्याने पीक पुन्हा लावू...

पाऊस कहर बनतो जेंव्हा....

धडा देऊन जातो पृथ्वीला,

जपावे निसर्ग ठेऊन भान

हीच खरी पृथ्वीची शान!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy