असाच हसरा रंग राहू दे
असाच हसरा रंग राहू दे
असाच हसरा रंग राहू दे
अर्धस्मित तव मुखावरी
मुग्ध नवोढेच्या गाली लाली
गुपित सांगते कितीतरी
असाच हसरा रंग राहू दे
हरिकृष्णा तव वदनासी
चोरुनी लोणी रोजच खाता
पकडी यशोदा कन्हैय्यासी
असाच हसरा रंग राहू दे
ओल्या मेंदी तळव्यावरती
नाव त्याचे कोरता तयावरी
लाज बावरी मुखावरती
असाच हसरा रंग राहू दे
अनंतकाळे वसुधेचा
असेच ऋतुचक्र चालू दे
आस अंतरीची परमेशा
