असा प्रेमाचा छंद हो...
असा प्रेमाचा छंद हो...

1 min

21
मी मांजा तु पतंग हो ,
माझ्या स्वप्नात तु दंग हो,
उडूया उंच उंच आकाशी ,
असा प्रेमाचा छंद हो ....
निळ्या आकाशाचा रंग हो,
काळ्या मेघाचा अंग हो,
चिंब चिंब होऊ सवे ,
असा प्रेमाचा छंद हो ....
ओल्या मातीचा सुगंध हो,
नादखुळा संग हो ,
डोळ्यात साठवुन घेईल ,
असा प्रेमाचा छंद हो ...
श्वासांत गुंतलेला बंध हो,
मन मोहरून गंध हो,
प्रिती उमलणारी कळी,
असा प्रेमाचा छंद हो ....