STORYMIRROR

Usha Khandagale

Inspirational

3  

Usha Khandagale

Inspirational

अरुणोदय

अरुणोदय

1 min
182

फाल्गुन वद्य तृतीयेला

एक तारा धरेवर आला

रविकिरणांसम तेजाने

शिवनेरी उजळून गेला !!१!!


ढोल नगारे ताशे झडती

सनई चौघडे वाजत होती

धन्य माऊली जिजाऊ पोटी

पुत्र अलौकिक झाला !!२!!


रवी किरणांचे तेज फाकती

पशू पक्षी ही किलबिल करीती

स्वराज्याचा अरुणोदय तो

तेजाने किती झगमगतो !!३!!


बोले जननी ते उदगार

कर रयतेचा तू उध्दार

पसरून दे रे चौफेर

राष्ट्रप्रेमाची झालर. !!४!!


अन्यायाला मारुनी लाथ

मावळ्यांची घेऊन साथ

क्रूर शक्तीला मार बाळा

तू रयतेला तार  !!५!!


जननी ने त्या शपथ घेतली

रयतेसाठी कंबर कसली

केला बाळ तयार

तिचा हा केला बाळ तयार !!६!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational