STORYMIRROR

Manda Khandare

Inspirational

3  

Manda Khandare

Inspirational

अरे विठ्ठला विठ्ठला

अरे विठ्ठला विठ्ठला

1 min
257

अरे विठ्ठला विठ्ठला

टाळ मृदूंगाचा नाद

घुमतोया माझ्या मना

घालतोया मला साद


अरे विठ्ठला विठ्ठला

तुझ्या वारी चे रे वेड

लगलेया डोळ्यास या

घाल भेटी चा तू मेळ


अरे विठ्ठल विठ्ठला

एकादश आली घरी

संकट उभे दारा पुढे

कशी येऊ तुझ्या वारी


अरे विठ्ठला विठ्ठला

कसे सांगु माझी कथा

तुझ्या दर्शनाची आस

माझी ऐवढीच व्यथा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational