अरे संसार संसार
अरे संसार संसार
भातुकलीच्या खेळामधली
आपली प्रेम कहाणी,
तू माझा दिलबर जानी
मी तुझी झाले राणी.
इवल्या इवल्या घरट्यामध्ये
संसाराची खेळणी,
तुझी माझी जोडी जमली
गाऊया सुंदर गाणी.
प्रेम फुलांचा वर्षाव
फुले रोज आयुष्यात,
गाढा ओढता संसारी
प्रेम वळे कर्तव्यात.
संघर्षाला हरवत
संसारात गुरफटलेले,
कष्ट तुझे हात माझे
संसारात फुललेले.
इवला इवला संसार
नांदू सुखाने सारे,
देऊन एकमेकास साथ
फुलवू संसार गोड रे.
