STORYMIRROR

Pranjali Kalbende

Abstract Others

3  

Pranjali Kalbende

Abstract Others

अपूर्णत्व घेता घेता...

अपूर्णत्व घेता घेता...

1 min
526

उद्या मी नसेल तर

नाव माझ काढतील

कर्तृत्वाचा लेखाजोखा

सारेजण वाचतील......१!!


शक्य जितके होते ते

कर्म आता केले आहे

स्वप्नं अधूरी डोळ्यात

पूर्ततेची वाट पाहे....२!!


गेले राहून काहीसे

आयुष्यात जगायचे

किर्तीवाढ रोपट्याने

मधातच खुंटायचे.....३!!


संशोधक होण्यासाठी

पराकाष्ठा करे मन

मरणाचे दार येता

शोधकार्य होई भग्न.....४!!


सामाजिक कार्यकर्ता

पद राहिल ऊरात

अपूर्णत्व घेता घेता

निसर्गाच्या सानिध्यात....५!!


उद्या मी नसेल तर

शब्द माझे रूसतील

शब्दखेळ खेळावया

नवे मित्र नसतील.......६!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract