अपेक्षाभंग
अपेक्षाभंग
आशीर्वाद देणाऱ्याचे
चरणस्पर्श
करून करून
पार वाकून गेलाय
पाठीचा कणा ....
पण
कुणाच्याच आशीर्वादात
नाही सापडला मार्ग
अपेक्षापूर्तीचा ....?
अपेक्षाभंगाच्या अश्रूंना
कसे रोखायचे
पापण्यांच्या कपारीत ....?
आयुष्याची रखडलेली गाडी
कशी रुळावर आणायची
उष : कालाच्या दिशेने ....?
शेवटी ,
पोकळ वल्गनाचं असतात
आशीर्वादाचे शब्द
पाठीचा कणा
वाकल्यावर उमजलं ....!!!!
