Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sayli Kamble

Tragedy

5.0  

Sayli Kamble

Tragedy

अनुत्तरीत प्रश्न

अनुत्तरीत प्रश्न

1 min
737


आजही आठवतोय तो दिवस मुलाला शाळेत घेऊन जाताना

पाहिले होते मी त्याच्या डोळ्यातील असंख्य प्रश्नांना


पकडला होता त्याचा हात घट्ट कर्तव्य बजावताना

मी सदैव तुझ्यासाठी खंबीर असेन हे सांगायचे होते त्यातून त्याला


आज मुलगा मोठा झालाय, पाहून आनंद होतो त्याच्या यशाला

हातांची पकड आता सैल झाली तरी आशिर्वाद भरभरून मिळो त्याला


आजही दोघे एकत्र निघालो, पण आज मुलगा नेत होता बापाला

आज प्रश्न माझ्या डोळ्यांत, खरंच पर्याय नसे का व्रुध्दाश्रमाला


Rate this content
Log in