STORYMIRROR

Raghu Deshpande

Inspirational

4  

Raghu Deshpande

Inspirational

अनुभव

अनुभव

1 min
480

मरायचेच आहे एक दिवस

म्हणून का कोणी जगणे सोडतें....?

परिस्थितीशी सामना करून

पुन्हा जोमाने आशा अंकुरतें...!


हिशोब मांडला सुख दुःखांचा

गोळाबेरीज नात्यागोत्यांची....!

जन्म घेतला अनुभव केला

कुरघोडी ती एकमेकांची...!


सगळें कुठलें मना सारखें

खारट आंबट चव ती न्यारी...!

ऊन सावली अनेक वेळी

कधी श्रीमंती कधी भिकारी...!


जगून घ्यावे मरणासाठी

कोण कुणाला पुन्हा विचारी...?

चार दिवस अश्रू ढाळीती

पुन्हा नव्यानें नवी उधारीं....!



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Raghu Deshpande

Similar marathi poem from Inspirational