STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract Inspirational

4  

Kanchan Thorat

Abstract Inspirational

अंतर्मन

अंतर्मन

1 min
244

हा सुसाट सुटलेला वारा,

मला माझंच अंतर्मन वाटतंय.

हवं तसं बेछूट होऊन,

मन नुसतं उधळतय !


ना कोणती मर्यादा त्याला ,

ना कोणाची पर्वा .

संस्कृती अन शालिनतेचे ;

ना गोडवे ते गात आहे.


कशाला घाबरायचे कुणाला?

जर मी स्वतंत्र आहे!

स्वातंत्र्याची मशाल 

आज माझ्या हातात आहे.


ही मशाल वणवा लावेलच,

खात्री आहे मला....

अस्मितेची ठिणगी पडेलच,

मनात तिच्याही ;खात्री आहे मला !


माझे मला माहीत आहे;

काय बरोबर काय चुकीचे आहे.

पण तरीही...

हा सुसाट सुटलेला वारा,

मला माझंच अंतर्मन वाटत आहे...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract