STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे

1 min
311

जन्मले ऑगस्ट महिन्यात

थोर असे समाज सुधारक

अण्णाभाऊ साठे नाव त्यांचे

लोकशाहीर आणि लेखक.......१


सांगली जिल्हा वळवा तालुक्यात

वारेगाव असे त्यात एक

बाप भाऊराव आई वालुबाई

त्यांच्या पोटी जन्मला लेक......२


होई जातीभेद खूप

टाकले तरी शाळेत

दिड दिवस राहिले

शिक्षकांनी काढले मारीत.....३


प्रतिभा अंगी तरीही किती!

पस्तीस कादंबऱ्या, पंधरा लघुकथा

लिहती दहा पोवाडा शैलीत गाणी

अन् एक डझन होती पटकथा....४


मुंबईत आले तेथेच रमले 

मुंबईची लावणी धारधार

शोषण करणारी इथे जमात

सांगे मुंबईचा गिरणी कामगार....५


फकिरा मिळवी राज्य पुरस्कार

अनुवाद साहित्याचा सर्व भाषेत

डॉ. बाबासाहेबांच्या झुंजार

लेखणीला नम्रपणे करी समर्पित...६


कम्युनिस्ट होवून जातात सोबत

डी. एन. गवेकर व अमर शेख ती

लाल बावटा कला पथक गाजत

देश विदेश ढवळून हो काढती.....७


स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी

वीस हजारांचा मोर्चा काढती

घोषणा गाजे "ये आझादी झुठी है, 

देश की जनता भूखी है" सांगती....८


आंबेडकर विचार बाणे अंगी

दलित साहित्य संमेलनात गुढ सांगितली

पृथ्वी ना तरली शेषनाग मस्तकी

दलित कामगार तळहातावर तरली.....९


कार्याची घेत मग दखल

टपाल तिकीट पुण्यात स्मारक

कुर्ला एका उड्डाण पुलास नाव

विकास मंडळ, संमेलन भरती कैक.....१०


वैजयंता, वारणेचा वाघ

अशी ही साताऱ्याची तऱ्हा

कादंबऱ्या अशा हो खास

सात चित्रपटात फकिरा गाजे हा.....११


नाटक शाहीरी पोवाडा

रशियात तो पाहा नेला

शिवराय परदेशी पहिल्यांदा

हा लोकशाहीर घेवून गेला.....१२


पाहा पन्नाशीच्या आतच

केला काळाने कसा घात

लोकशाहीर साहित्यसम्राट

विलिन होई पंचतत्वात.....१३


साहित्य तुमचे वाचता

अंगावर शहारे काटा

मागणे एकच मागतो आता 

चालावे आम्हीही तुमच्याच वाटा....१४


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational