अण्णाभाऊ साठे जयंती..!
अण्णाभाऊ साठे जयंती..!
अण्णाभाऊ साठे....जयंती
विनम्र अभिवादन....!
आण्णा म्हणजे अण्णा होते
हे कोणी सांगण्या नको
त्यांच्या लेखणीची तुलना
करणेच नको
लेखणी अशी झिजली
की तिने बाकी काही ठेवले नाही
जे जे लिहिले ते ते कधी
कमी कधी वाटत नाही
मनमुराद आस्वाद घ्यावा
ज्याने त्याने गर्भात शिरून
अंतःकरणास खिळून ठेवीते ती
मायेने हात डोईवरी कुरवाळून...
आशा सदृढ लेखणीस स्मरूनी
वंदन करू आज थोडे लवून....!
अण्णाभाऊच्या चरणी
ही काव्यसुमनांची भावांजली.....!
