STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

अंकुराशा

अंकुराशा

1 min
434


छोटंसं रोपटं

कुजबुजलं कानात

'घाल पाणी मला

उभा भी रानात'.


'आहे अजून लहान

काळजी घे तोवर

करीन परतफेड मग

मोठा झाल्यावर,'


'देईन फळे-फुले

छायाही गारगार

पण कधीच नको करू

चुकूनही वार.'


'दे जीवनाचे दान

वाढू दे वनराई

करून पर्जन्य वृष्टी

होऊ आम्ही उतराई'


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational