अंगाई
अंगाई
गाई गाई जो जो बाळा
तुला गाते रे अंगाई
दो हातांचा करुनी झोपाळा
तुला जोजवी तुझी आई
नाही पाळणा चंदनी
नाही उबदार दुलई
बांधली बघ रे झोळी
या झाडांवर छानशी बाई
नाही बांधली खेळणी
खरा चांदोबा हासे आभाळी
चांदण्या लुकलुकती रे
वाराही गाई अंगाई
घर दार अपुले सुटले
महामारीने सारे विटले
पण प्रेम नाही आटले
आजा आजी तुझी वाट पाही
वन रान हे तुडवीत
चल जाऊ या आजोळी
मामा देईल हवे ते तुजला
प्रेमे घालील तुज आंघोळी
