अंधश्रध्दा
अंधश्रध्दा


प्रगती वारे
विज्ञान आधार
आयुष्य सुधार
झाले ना रे ?
निघे कामास
आडवे मांजर
लागे चिंता जर
फिरू धामास ...
खरेदी करू
गाडी विदेशाची
मिरची लिंबाची
बांधणी करू ...
अवस आली
शुभ नको काही
लाभणार नाही
पापच भाळी ...
त्या ग्रहणात
बंद होती दारे
कशाला नजारे
ते पाहतात ?