STORYMIRROR

Rajesh Sabale

Tragedy

3  

Rajesh Sabale

Tragedy

।।अंधश्रद्धा।।

।।अंधश्रद्धा।।

1 min
168

मंत्र-तंत्र, जादूटोणा बुवाबाजी सोडा सर्व आता।

अंधश्रद्धा सोडून काही, नवं चांगल करा आता।।


कोंबडया-बकरे मारुन, देव पावणार नाही।

पोरं-बाळ बळी देऊन, धन मिळायचे नाही।।

लई झाले उपास अन, नवस फेडला कधीचा।

हाती काही येत नाही, आधी शोध घ्या मनीचा।।

बरं वाईट मनामधी काही, उगा आणू नका आता।

अंधश्रद्धा सोडून काही, नवं चांगल करा आता।।१।।


शेंदूर फासून फुल टाकून केला, दगडाचा देव।

आडणी माणसाला वाटू लागे, लई त्याचं भ्याव।।

ओबडधोबड दगडाला मारी, छन्नी हातोड्याचा घाव।

अन मंदिरात ठेवून म्हणती त्याला, देवा आता मला पाव।।

झालं गेलं विसरून सारं, जरा विचार करू या आता।

दगड पुजायचा सोडून, जरा माणूस जोडू या आता।।२।।


तूच तुझ्या हाताने बांधिले इथे, दगड मातीचे मंदिर।

अन त्यात ठेवून दगडाला तूच, फासला की शेंदूर।।

गाजा-वाजा करून मोठा, मंडप उत्सव घातला।

अन रंग लावून पूजेसाठी पैसा, दानपटीत टाकला।।

तरी वर्गणीची, पैसे चार चौघात बसुन घेता।

लोकांच्या पैशातून देवाचा उत्सव करता।।३।।


खुलेआम गावोगावी असा सारा, चाललंय धंदा।

लोक चंद्रावर गेले तरी, देवासाठी मागतात चंदा।।

जुन्याच समजुती अन जुन्याच चाली-रीती।

बुवा-बाजीवाले लोक, घाली माणसास भीती।।

काय उफराटा खेळ, भुई माणूस खेळतोय आता।

तुझ्याच निर्मात्याला तूच, जन्म कसा देतो आता।।४।।


तेहतीस कोटी देव असून, आमची गरीबी का हटना।

अन मंदिर देवाचे नाही असा, गाव मला कुठं दिसना।।

दानपेटी चोरी होता असता, देव मंदिरात होता।

मग चोरा झाली तवा काय, गाढ झोपी गेला होता।।

कवी राज म्हणे माणसा, डोळे उघडे ठेव आता।

अन अंधश्रद्धा सोडून, माणसात देव पाही आता।।५।। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy