STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Horror

3  

Kshitija Kulkarni

Horror

अंधारातला हिरवेगारपणा

अंधारातला हिरवेगारपणा

1 min
122


अंधारात दिसतो तसा हिरवेगारपणा

रस्ता आहे कसा जीवघेणा


पाऊलांचे ठसे मिटलेले दिसतात

उमटायच्या आतच पुसलेले असतात


निर्जीव आहे दोन्ही बाजूंना

धास्ती वाढती पावलांची पाऊलांना


मधोमध आल्यावर गोंगाट वाढला

कोणीतरी जवळून सुसाट पळाला


गोंगाट माझ्या अगोदर पोचला

दुष्टचक्रांचा फेरा भोवतींन थांबला


सुटका होणार असं वाटलं

श्र्वासाच अंतर अजून लांबलं


नजर चुकवत चाललो जोरात

पडलो स्वप्नात स्वतःच्या दारात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror