सरलेल्या भावना
सरलेल्या भावना
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11
नजर आकाशात
पावसाचा कहर
पडली विचारात
किती प्रहर
मनाला कसंतरी
थोडं समजावलं
डोळ्यातल्या अधांतरी
रस्त्यांनी थांबवलं
जाऊदे मनाचं
करायचं काय
सरलेल्या भावनांचं
सऱ्यांना काय
पडलेल्या थेंबांना
जाणीव तहानेची
गेलेल्या क्षणांना
उणीव नशीबाची
पडणारे सरणारे
बघत रहाती
मातीत भिजणारे
झुरत रहाती