दुःखाची फुले
दुःखाची फुले
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
5
पाण्याविना कोरडी
आसवे भिजली
चिरलेली कातडी
अजून चिरली
आरपार गेलेली
चोळली जखम
मिठाने भरली
फुटला दम
यातनांच्या पलीकडे
वसले खोल
हसले थोडे
मिटले बोल
दुःखाच्या फुलांना
कळत नाही
आर्त हाकांना
जागच नाही
तरीही टेकती
आभासी स्वप्नांना
उगा पळवती
गेलेल्या दिशांना