STORYMIRROR

manasvi poyamkar

Abstract Tragedy

3  

manasvi poyamkar

Abstract Tragedy

अंधाराचे जग.....

अंधाराचे जग.....

1 min
251

एक जग हे असे भयानक

जिथे अंधारचे राज्य आहे

दुख वेदना आणी द्वेष

ह्यांचे स्वर वाजत आहेत..

अश्या ह्या काळ्या नगरित

पुन्हा एका दिव्य परिचा जन्म झाला

दिव्य तिच्या त्या तेजाने

अंधार सारा होरपळुनी गेला

टाहो तिचे सांगत आहेत

जगण्याचे आर्जव

पण अंधारी नांदत आहे

तिच्या मृत्यूचे तान्डव

अंधाराच्या छायेत तिच्या आशा जळत आहेत

परी नको पण राजकुमार हवा

म्हणुन तिला सारे मारत आहेत

अंधश्रधेच्या पडद्यामागे

मुलासाठी मुलीला मारत आहे

ह्या जगात येण्याआधीच

प्रेत तिचे जळत आहे.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract