अंध:कार
अंध:कार
इतक्या दिवस शब्दांचा वार होता..
पण या डोळ्यांपुढे अंध:कार होता..॥
वाटे मनाला भेटला विचार करणारा..
पण, तो सुद्धा एक कलाकार होता..॥
खोट्या दुनियेत विचित्र रंग भरणारा
अनामिक एक खोटा चित्रकार होता..॥
धारधार कलमेतून कठोर त्या शब्दांचे..
शब्दसुमन मांडणारा तो पत्रकार होता..॥
शेवटी एकदा कळले, या वेड्या मनाला..
अरेरे, खोट्या प्रेमाचा तो व्यवहार होता..॥
