अन् येऊ कशी तशी मी कामाला?
अन् येऊ कशी तशी मी कामाला?
नेहमीच ताई तुमची घाई
फोन लागलाय वाजायला
कोरोना समद्या घराला हो
अन् येऊ तशी कशी मी कामाला?
कुणाला येई सणकून ताप
अंगदुखी देतीया त्रास
टेस्ट पाँझिटिव्ह आलिया हो
अन् येऊ तशी कशी मी कामाला?
संसर्गाचा रोग करोना
तुम्हां कसा झाला कळंना
होळीमध्ये वाजे बेंडबाजा
अन् येऊ कशी तशी मी कामाला?
काळजी घ्यावी सर्व सांगती
नका फिरकू रोग्यांपाशी
सोडू नका म्हणे घरकुलाला
अन् येऊ तशी तशी कशी मी कामाला?
सावट जाईल कोरोनाचं
राज्य येईल आरोग्याचं
सांभाळा हो तब्येतीला
अन् येऊ तशी कशी मी कामाला?
