STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy Inspirational

3  

Pandit Warade

Tragedy Inspirational

अन् देव्हारा ओस पडला

अन् देव्हारा ओस पडला

1 min
146

असा कसा हो घात झाला, सूर्योदयी सूर्यास्त झाला

अनाथांचा नाथ आज हा, असा कसा हो रुष्ट झाला?


गुढ्या, तोरणे, बॅनर्स लावून नगरी सजली स्वागताला

वाट नेत्याची पाहू लागल्या आतूर, आसुसलेल्या नजरा


नियतीने पण डाव साधला, काळाने घालाच घातला

सदा सदोदित अजिंक्य नायक जीवन सारीपाट हारला 


संघर्षाने भरले जीवन, तरी कधीही नाही डगमगला

धैर्याने सामोरे जात नाथ हा, सदा विजयी होत राहिला 


उच्च ध्येय ते ऊरी घेऊनि, अहोरात्र तो फिरत राहिला

जण विकास हा ध्यास धरूनि नवी स्वप्ने तो पहात राहिला


स्वप्ने साकारित होण्याचा क्षण आला पण घात झाला

क्षणात सारा डाव उधळला निरोप जगाचा त्याने घेतला


नाथ जणांचा मनात ठसला, हृदय देव्हाऱ्यात बैसला

कसा अचानक निघून गेला, अन् देव्हारा ओस पडला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy