अमूल्य जीवन
अमूल्य जीवन
अमूल्य जीवन
अमूल्य असे जीवन
नाही मिळणार पुन्हा
जगू आनंदे स्वच्छंद
बनू गोकुळचा कान्हा....
सुंदर अशा जीवनाचा
घ्यावाच मस्त उपभोग
मनुष्यजीवन हे प्राप्त
भांडणाचा ना उपयोग!!
क्षणभंगुर झाले जीवन
बनलेय अगदीच नश्वर
असु द्या ओठांवर गोडी
साथ करीलच परमेश्वर !!
जगूया हासत-खेळतच
रोजचा आपला हा दिन
ताणतणावाने बने मग
मनुष्यजीवन दीन क्षीण
