अक्षय नाती
अक्षय नाती
या मधुर चांदण्या राती
कशास हवी
दिवा अन ज्योती
या चंद्र प्रकाशी येईल
बहरुन अपुली प्रिती
नको वेळ दवडू आता
मुकी प्रेमाची भाषा
पल्लवित झाली आशा
सारे मनासारखेे होईल
निघुन गेली भीती
राहीले न अंतर आता
हे प्रेम निरंतर आता
ही अमर व्हावी गाथाा
ना.ह्या निर्थक बाता
ही वीण घट्ट होईल
अन अक्ष रहातील नाती

