अखेरचे दान
अखेरचे दान
दिल्या उन्हात सावल्या मी
जाणीव कुणा झाली नाही..
क्रूर कठोर कृतघ्न किती रे
शिरच्छेदा करून हत्या केली ..
आऱ्याची अणुकुचीदार दात
कटरचा आवाज कर्णकर्कश ..
जीवघेणा माझा मुकाआकांत
आंधळे प्रेक्षक होते सज्जन..
धडावेगळी झाली माझी मान
धारातिर्थी हिरवा पर्ण न पर्ण..
उमेद अजूनही मात्र जगण्याची
धरेशी जोडली मुळाची नाळ..
पडलो जरी मी उठेन परत
तुटक्या बुंध्यास ..फुटली पान
शिका लढायचा गुण तो माझा
जेव्हा अवचित उद्वस्त जीवन..
घेण्याची लुबाडण्याची वृत्ती
कुणी का होतो इतका लोभी..
जोपर्यंत प्राण माझ्या जीवात
सरणावरही देणाराचं ठरेन मी..
जरी काटेरी फळ आत गोड गर
खोटेपण कधी असते बाह्यदर्शन..
अंतरीचाही असे गोड तो भाव
बहुतांच्या अंतरी नित्य शोधावा..
देणाऱ्याचा हात सदा तो वर
नका होऊ उगा कुणी याचक..
सबल श्रेष्ठ ईश्वरकृपेने असता,
दान करुनी जमवा पुण्यसंचय..
