STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

अखेर...

अखेर...

1 min
12

मन झाले हे आज उदास उदास, 

थांबू लागले कसे हे जीवनाचे श्वास.


नाही उरला आता अंगात त्राण, 

वाट पाहू लागलो कधी जाईल हा प्राण.


वेळ आली आता ही डोळे मिटण्याची,

नाही उरली आशा आता कोणाला भेटण्याची.


कधी सोडेल जग याचा नाही उरला भरवसा,

नका रडू असे तुम्ही माझ्यासमोर ढसाढसा.


नका लावून घेऊ असा जीवाला हा घोर,

तुमच्याचसाठी आहेत ही आधार पोर.


जाऊ द्या हो मला आता नका अडवू कोणी,

शेवटचे पाजा हो दोन थेंब पाणी.


मन झाले हे आज उदास उदास, 

थांबला असा हा जीवनाचा प्रवास.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy