STORYMIRROR

Shekhar Chorghe

Romance

2  

Shekhar Chorghe

Romance

अजूनही

अजूनही

1 min
13.9K


दिसते मला तुझ्या डोळ्यांतली लाज अजूनही 

फुलतो आहे गुलाब तुझ्या ओठांवर अजूनही 

काही तरी आहे तुझ्या पाहण्यात गं सखे 

उगा ना चालतात बाण माझ्या हृदयावर अजूनही 

पाहतो मी जेव्हा तुला नव्याने प्रेमात पडतो तुझ्या 

उगा ना सुचते काव्य मला तुझ्यावर अजूनही 

या हृदयात आहेत लपविली मी दुःखे किती ही 

तुझे एक हास्य उमलले ओठांवर की सुखाचा बहरे वसंत अजूनही 

एकदाच तू घे मिठीत मला अन् सा-या वादळांना शांत कर 

होता पेटला जो समुद्र अंतरात माझ्या तो वाट पाहतो तुझी अजूनही...


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance