अजूनही (शोकगीत)
अजूनही (शोकगीत)
तुम्ही निघून गेल्याची
पोकळी अजूनही...
व्यथा तुमच्या जाण्याची
कोवळी अजूनही...
ओढ लागून तुमची
मन माझे झुरते...
डोळ्यातून आठवण
नकळत झरते...
नात्याची तुटली नाही
साखळी अजूनही...
व्यथा तुमच्या जाण्याची
कोवळी अजूनही
सावरता येणार ना
हा संसार मोडका
फार छळतो जीवाला
आठवांचा हुंदका
भरतात वेदनांनी
ओंजळी अजूनही
व्यथा तुमच्या जाण्याची
कोवळी अजूनही
तुमच्याविना हे घर
सुने सुने वाटते
उरी राहून राहून
आठवण दाटते
घरी ना वाहते हवा
मोकळी अजूनही
व्यथा तुमच्या जाण्याची
कोवळी अजूनही
