अजूनही आठवतात मला...
अजूनही आठवतात मला...
अजूनही आठवतात मला त्या रात्री, मी जागवलेल्या
काही वेड्या भावनेने, तुला आठवत घालवलेल्या
अजूनही आठवतात मला, माझे तुझ्यासाठीचे छंद
अन त्यावर फुंकर घालणाऱ्या,तुझ्या आठवणी मंद
अजूनही आठवते मला, माझ्याकडे बघून तुझे हसणे
अन त्यानंतर माझे, तुझ्या आठवणीत रमून बसणे
अजूनही आठवतात मला, माझ्या तुझ्यावरील कविता
त्या आठवणींच्या उजाळ्यात, नयनी वाहते सरिता
अजूनही आठवतात मला, आपल्या सर्व भेटी
आनंदापुढे त्या मज, वाटे दुनिया छोटी
अजूनही आठवतात, फोनवरील आपले संवाद मला
अपेक्षा करतो एकदातरी, आठवले असेल सर्व तुला
अजूनही आठवतात मला, तुझे सर्व शब्द
ज्यामुळे केलेस मला, तुझ्या प्रेमापाशी बद्ध
अजूनही आठवतो मला, तुझा नकोसा नकार
उघडलय ज्याने माझ्यासाठी, अनंत दुःखाचे कोठार