अजुन ही वेळ गेली नाही
अजुन ही वेळ गेली नाही
ख़ुप काही तिच्या मनात असते.
ख़ुप काही तिला खुपत असते.
न बोलता ती सगळ करत राहते
नवरा कसा ही वागो,
बायको म्हणुन ती सहन करत राहते.
मूल मनमानी करतात
आई म्हणुन ही तीने मध्ये बोलायचे नसते.
ख़ुप काही तिच्या मनात असते.
सगळेच तिला उलटून बोलतात,
कारण सगळ्यांनी तिला गृहीतच धरलेले असते.
येणारी सुन ही मग तिला कमी लेखत राहते.
इतके पण नको ग गप्प राहु,बोलून टाक जे सलते काही.
बघ अजुन ही वेळ गेली नाही.
तुला ही मत आहे,तुझ ही अस्तित्व आहे.
उद्या पश्चाताप करण्या पेक्षा ,आज जागी हो.
अजुन ही वेळ गेली नाही.
