ऐसे कैसे जाले भोंदू
ऐसे कैसे जाले भोंदू
ऐसे कैसे जाले भोंदू ।
कर्म करोनि म्हणती साधू ॥१॥
अंगी लावूनिया राख ।
डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥
दावूनी वैराग्याची कळा ।
भोगी विषयांचा सोहळा ॥३॥
तुका म्हणे सांगो किती ।
जळो तयांची संगती ॥४॥
