ऐका राया फुकटचा सल्ला देऊ नका
ऐका राया फुकटचा सल्ला देऊ नका


ऐका राया फुकटचा सल्ला देऊ नका
तोंडावर पाडून आम्हाला ऐकायला लावू नका.
तुमच्या नावाची कथा
आपल्या घरच्या जीवनाची कशी मांडू व्यथा.....!
तु माझं ऐकून घे रे दादा
तुझं काम करून देतो हाच माझा वादा
उगीचच मारतो फुशारक्या दादा.....!
काय काम धंदा नाही करत भावड्या
साऱ्या गावात तू झाला रे नावड्या
सगळी कामाला जातात भामट्या
आयत्या ताटावर फिरवतो दिवट्या......!
सगळ्यांना सांगत सुटतो मी
खूप प्रयत्न करत राहतो
घरात बसून अधिकारी बनतो.
दिवस मावळायच्या वेळी मोठ्या
पाटीलकीच्या बढाया नको त्या करतो.
मापं काढली की चुमित घरची वाट धरतो....!
काम न करणारे कामगारांची कथा
पाठीमागं बोलून दाखवली जाते व्यथा
बेकार होती फुकटचा
सल्ला देणाऱ्यांची अवस्था.....!