अहो माझे हिरो तुम्ही बाबा
अहो माझे हिरो तुम्ही बाबा
माझा हृदयाला स्पर्श करणारा
माझा खरा मित्र माझा बाबा
ही दुनियादारी मला दाखवली तुम्ही
अहो माझे हिरो तुम्ही बाबा ।।१।।
लहानपणी मला लाड तुम्ही केला
जीवाचे रान करूनी सोण्याचा घास आम्हा दिला
हे तुमचे जे उपकार आम्ही कधी फेडू नाही शकणार
असे आमचे हो तुम्ही स्वप्न पूर्ण केले हो बाबा
ही दुनियादारी मला दाखवली तुम्ही
अहो माझे हिरो तुम्ही बाबा ।।२।।
जे काही आम्ही मागितले ते तुम्ही आम्हास दिले
खांद्या कड्यावर धरूनी जीवनाचा हर क्षण दिले
न कळता आम्हा सर्व काही आणूनं दिले
असे लाड आमचे केले तुम्ही बाबा
ही दुनियादारी मला दाखवली तुम्ही
अहो माझे हिरो तुम्ही बाबा ।।३।।
