STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

अग्नी

अग्नी

1 min
986

अग्नी दाहक ना फक्त

अग्नी नसे जीवघेणा

उर्जा अंगी भयंकर

स्पर्श पोळतो वेदना


अग्नी देतसे ऊबही

जीवघेण्या थंडीमधे

नसे हिटर घरात

जाळ शेकोटीचा पुरे


कसा आदिमानवांनी

शोध अग्नीचा लावला

अन्न शिजवण्यासाठी

यत्ने वापरही केला


अग्नी लागे यज्ञासाठी

त्याच्या साक्षी लग्नगाठी

 लाजाहोम विवाहासी

अग्नी लागे कार्यासाठी


जीर्ण पर्ण नि पाचोळा

असे टाकून देण्याला

अग्नी करीतो भक्षण

स्वच्छ ठेवी वसुधेला


बहुविध उपयोगी

ऋषीमुनी यज्ञयागी

नसे फक्त दाहकचि

अग्नी बहुउपयोगी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract