अधीर झाले मी
अधीर झाले मी
अधीर झाले मी
तुझ्या दर्शनाला
दर्शन द्या मला
पांडुरंगा.
पाण्याविन मासा
जैसी तळमळ
मनी कळकळ
माझ्या मना.
आईविन बाळ
होतो वेडापिसा
मीही झालो तसा.
पांडुरंगा.
सुंदर ते ध्यान
उभे विटेवर
कर कटेवर
युगे युगे.
सुखाचे आगर
भक्तांचा तू सखा
प्रेमाचा तू भुका
पांडुरंगा.
