STORYMIRROR

Jayshri Dani

Abstract Classics

4  

Jayshri Dani

Abstract Classics

अडकीत जाऊ...

अडकीत जाऊ...

1 min
294

कित्येक स्त्रियाच स्त्रियांना

बोलू देत नाही मनातले

मारतात बत्ता 

ऊर्जास्रोत घेऊन 

येणाऱ्या शब्दांवर 

आणि मग मोठ्या खुषीत गातात

"अडकीत जाऊ खिडकीत जाऊ

खिडकीत होता बत्ता

भूलोजीला मुलगा झाला

नाव ठेवा दत्ता.."


मग हळूच एखादी

मनस्वी स्त्री

त्यात आपले नाव गुंफून

सांगू पाहते काही

केविलवाणे क्षण

पुन्हा सजग होतात साऱ्याजणी

आणि गाऊ लागतात मोठ्याने

"यादवराया या राणी

रुसून बैसली कैशी...?"


घेतो एखाद्या भुकेला पोरगा

आईला जीवघेणा चिमटा

आणि ज्या घरात घुसायची 

इच्छाच नसते माऊलीला

त्या घरात परतण्यासाठी

ती लगबगीने पुटपुटते

"बाणाबाई बाणा, परदेशी बाणा

गाणे संपले, खिरापत आणा"


अहाsssss चटकमटक चिवडा

मोटीची उसळ

शेवपापडी 

मन रमते तिथे थोडावेळ


पुन्हा,

ज्या घरातील चांदण्या

तिथेच ठेवून

काळोख लपेटत 

दबल्या पावलांनी 

घरी परततात स्त्रिया !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract