STORYMIRROR

Sarika More

Inspirational

3  

Sarika More

Inspirational

अचानक अपघात

अचानक अपघात

1 min
5

कसा कुठे घडून आला

अचानक अपघात झाला

जीव कितींचे जेष्ठ लहान

प्रत्येकजण प्राणाला मुकला

जग कुणाचे बदलून गेले

स्वप्न पाण्यात वाहून गेले

अनाथ कुणी कुणी अपंग

होते नव्हते जसे सर्व संपले

कुठेही कधीही कुणीही

बाहेर जगी या वावरतांना

आस कुणाची बोलाविते

किंमत द्यावी त्या भावनांना

रोखावे टाळावे प्रयत्न करुनी

घडणार नाही मग अनहोनी

समतोल राखता प्रत्येकांनी

सुख नांदेल प्रत्येक जीवनी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational