अबोला तुझा
अबोला तुझा
सांज सकाळ आज अबोल झाली
लाली सुर्यास्तची नजरेआड गेली
निशब्द जाहल्या या दिशा दाही
बोलवे कुणा आपले कोणीच नाही
किलबिलाट ती चिमणपाखरांची
लगबगाट ती बाजारात काकणांची
रोजची धावपळही वर्षभर थांबली
आज काळास त्या वेळ न भावली
क्षण क्षण अपुरे पडायला लागली
मनातल्या गप्पाना ओठातच दाबले
वाटते बोलायच आहे खुप काही
बोलयाच कारणच आज उरले नाही
मी जपाव मनात तू कराव जनात
विरले आज ते भाव मारण्याच्या दारात
शब्दांच्या तुझ्या त्या घयाळ जखमास
अजुनी जरा खपली का धरली नाही
सांज सकाळ आज अबोल झाली
लाली सुर्यास्तची नजरेआड गेली
निशब्द जाहल्या या दिशा दाही
बोलवे कुणा आपले कोणीच नाही
अबोला असा तू धरला कसला
अशांत मनाची काय ही अवस्था
बोलावेसे वाटते तुझ्याशी आता
जाणते जगात या आता तू नसता
बोलवेना जणू नभास कळा लागल्या
मेघांचया आसवात कथा तुझ्या वाहिल्या
दु:खास पार केले तरी डोळे पाणावती
बोलवे कोणाशी क्षितीजापार तू गेली
आज चिमुकलीच्या नजरेत आस होती
तुझ्या हाताची चव तुप पोळी हवी होती
नजरेतील तुझी उणीव भासू लागली
बोलू कोणाशी तू क्षितीजापार गेली...
